HW News Marathi
देश / विदेश

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणी राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

नवी दिल्ली |मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी मुंबई हायकोर्टाने CBIने करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण आता मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आज (६ एप्रिल) ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या याचिकेत संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी CBIला परवानगी दिली आहे. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीला पोहोचले होते. अनिल देशमुख यांनी सोमवारी रात्री उशिरा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर परमबीर सिंग प्रकरणातील मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचं सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल केलं आहे.पाटील यांना सीबीआयने संपर्क साधल्याची माहिती आहे. सीबीआय पाटील यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची आज माहिती घेणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टा या प्रकरणात काय निर्णय देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, दिल्लीहून सीबीआयची एक विशेष टीमही या तपासासाठी मुंबईत दाखल झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाजपेयींना श्रद्धांजली देण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण

swarit

पंतप्रधान मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकसारखीच !

swarit

हॅट्रीक चुकवायची असेल तर राणेंनी विधानसभा लढवू नये !

News Desk