HW News Marathi
देश / विदेश

राज्यातील आयुर्वेदीक डॉक्टर्सही घेणार ‘कोरोना’ उपचारासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण

मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांच्या नोंदणीकृत आयुर्वेदिक डॉक्टरांना ‘कोरोना’ उपचारासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. वैद्यकीय व्यवसायी, पदव्युत्तर विद्यार्थी व आंतरवासीयता प्रशिक्षणार्थी यांनी एक परिपत्रक काढून सर्व डॉक्टरांना याबाबत कळविले आहे. येत्या एका आठवड्यात या आयुर्वेदीक डॉक्टरांनी ऑनलाईनपद्धतीने ‘कोरोना’संदर्भातील आवश्यक ते प्रशिक्षण घेणे अपेक्षित असल्याची माहिती मिळते. त्यामुळे, येत्या काळात कोणत्याही अडचणीशिवाय आयुर्वेदीक डॉक्टर्सही ‘कोरोना’ रुग्णावर उपचार करू शकतील.

राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता आपल्याला वैद्यकीय सेवांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, राज्यातील सद्यस्थिती हाताळण्यासाठी पुरेसा मेडिकल स्टाफ तसेच वैद्यकीय सोयी-सुविधा आणि अन्य वैद्यकीय साधने उपलब्ध आहेत. मात्र, राज्यातील वाढता आकडा पाहता येत्या काळात वैद्यकीय सेवा-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता पडू नये यासाठी राज्यासाठी सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी, पदव्युत्तर विद्यार्थी व आंतरवासीयता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आता कोरोना उपचारासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०२१ चा केंद्रिय अर्थसंकल्प सादर करण्याआधी सरकारला ‘या’ बाबतीत मिळाला दिलासा!

News Desk

शंभर पूल अतिधोकादायक

News Desk

सौदीमध्ये आजपासून महिला चालविणार गाड्या

News Desk