HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार

नाशिक | नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (४ डिसेंबर) साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असून महापौर सतीश कुलकर्णी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत त्यांच्याशी चर्चा केली. या दोघांनीही साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनास नाशिक महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असून निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नाशिकचे साहित्य संमेलन हे आपणा सर्वांचे साहित्य संमेलन असून सर्वांच्या सहभागाशिवाय हे यशस्वी होणार नाही. त्यामुळे नाशिककर म्हणून संमेलन यशस्वी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच महापौर म्हणून संमेलनासाठी येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचे स्वागत करावे लागणार आहे. त्यामुळे आपण या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना केले.

राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असल्याचे भुजबळांना सांगितले तर महापौर सतीश कुलकर्णी हे कार्यक्रमांत सहभागी राहणार असल्याचे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोन पोलीस रुग्णालयात दाखल

News Desk

‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’, गोपीचंद पडळकरांचा विजय वडेट्टीवारांवर हल्ला

News Desk

सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार !

swarit