HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला!” – महेश तपासे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या पदाधिकार्‍यांचे मुंबईमध्ये दिनांक २५ मे रोजी राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. या अधिवेशनाला प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री अदिती तटकरे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित राहणार आहेत.

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे ही राष्ट्रवादी व महाविकास आघाडी सरकारची कायम भूमिका राहिली आहे. छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करत आहेत, असेही महेश तपासे म्हणाले.

“भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला”

मनसेने पवारसाहेबांचा २०१८ चा फोटो व्हायरल करुन जो संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा राजकारणाशी काहीही संबध नाही. पवारसाहेब राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि ब्रिजभूषण हेही भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला आहे. मनसेकडून केलेला आरोप हा बिनबुडाचा व चुकीचा आहे. मनसेला राजकारणात महत्त्व उरलेले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर ते बोलत आहेत असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड येथे महिला भूषण पुरस्कार प्रदान सोहळा

News Desk

हिंदू असणे हे पाप आहे का?, गडकरींचा सवाल

News Desk

‘फी मध्ये ५० टक्के सवलत देऊन विद्यार्थी पालकांना दिलासा द्या,’ भाजपची मागणी

News Desk