HW News Marathi
महाराष्ट्र

“वानखेडे कुटुंबियांबाबत वक्तव्य करणार नाही!”, मलिकांची न्यायालयात हमी

मुंबई | वानखेडे कुटुंबायांबाबात वक्तव्य करणार नाही, अशी हमी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिला आहे. मलिकांनी त्यांच्या वकिलामार्फत न्यायालयाला हमी दिली आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी ९ डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई क्रूझ प्रकरणानंतर मलिकांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे याच्याविरोधात वारंवार आरोपाच्या फैरी झाडत आहेत. ज्ञानदेव वानखेडेंच्या अब्रुनुकसानीच्या आज (२५ नोव्हेंबर) सुनावणी पार पडली.

मलिक कधी पत्रकार परिषद घेऊन आणि ट्वीट करत वानखेडेंच्या शाळा सेडल्याचा दाखल, हॉटेलचे मालक, पहिला विवाहचे फोटो, विवाहचे कागदपत्रे आदी गोष्टी करत त्यांनी वानखेडेंच्या कुटुंबियांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. तसेच गेल्या आठवड्यात मलिकांना वक्तव्य करण्यापासून रोखण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ज्ञानदेव वानखडे यांनी मलिक त्यांच्या कुटुंबियांना विनाकारण बदनामी करत अल्याचे सांगत, मलिकांविरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २४ ते ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता

News Desk

आता ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ विधानसभा लढविणार

News Desk

‘जय जय महाराष्ट्र माझा’ लवकरच महाराष्ट्राचे राज्यगीत होणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती

Aprna