HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचारी सोमवारीपासून कामावर आले नाही, तर…! – परब

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, असा शेवटा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. कर्मचारी कामावर आल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घतले जाईल, असे देखील परबांनी आज (१० डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. जर एसटी कर्मचारी सोमवारीपासून (१२ डिसेंबर) कामावर आले नाही तर मेस्मा कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा परबांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनकरण करण्यात यावे. यासाठी गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचारी संपावर गेले होते. यासंपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ देखील केली होती. परंतु काही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. राज्यातील बहुतांश आगारातून बसेस सुटल्या आहे, तरी काही एसटीच्या आगारात अजून कर्माचऱ्यांचे संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परबांनी आज पत्रकार परिषदे घेतली होती.

संपामुळे कर्मचाऱ्यांना पगाराला मुकावे लागेल

जर एसटी कर्मचारी सोमवारीपासून (१२ डिसेंबर) कामावर नाही आली. तर मेस्मा कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल जे कर्मचारी सोमावारी कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे परब म्हणाले. एक महिन्यात जे कामगार कामावर आले नाहीत. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना पगाराला मुकावे लागेल. यावा नेते जबाबदार असून ते तुमची नुकसान भरभाई पण देणार नाहीत, असे ते म्हणाले

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल!

News Desk

राज्यातील थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

Aprna

‘२०२४ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस नंबर एकचा पक्ष असेल’, नाना पटोलेंचं वक्तव्य!

News Desk