HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर यावे, नाहीतर होणार कारवाई! – अनिल परब

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर यावे, कामावर रुजू न झाल्यास कारवाई होणार, असा इशारा देखील राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसार प्रमाध्यमांशी बोलताना म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच थकीत वेतन मिळणार आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगची करावाई करण्यात आले. तसेच २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यावर सरकारकडून कोणतीही कारवाई होणार नाही. परंतु, २२ तारखेनंतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार, असा इशाराही राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (७ एप्रिल) पत्रकार परिषदेतून केली आहे. 

अनिल परब म्हणाले, कर्मचाऱ्यांची नोकरी जावी असा कोणताही प्रयत्न केला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर यावे. कर्माचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे संपकरी कर्मचाऱ्यांनी पालन करावे. २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू न झाल्यास आम्ही कारवाई करू. कर्मचाऱ्यांच्या नुकसानीची दबाबदारी त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची असेल. ग्रॅच्युईटी आणि पीएफपासून राज्य सरकारने कोणालाही वंचित ठेवलेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.”

न्यायालयात नेमके काय म्हणाले

एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले आहे. मात्र, कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई नको, अशा सूचनाही उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही निवृत्ती वेतन मिळणार असून कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देण्याचे आदेश देखील न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. आता एसटीचे विलीनीकरणाच्या मुद्द्यांवर कर्मचारी हे गेल्या सहा महिन्यांपासून संपावर केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी कर्माचारी कामावर रुजू होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजयाबद्दल विश्वास नाही म्हणुन पंकजांची निवडणूकीतून माघार ,धनंजय मुंडेंचा टोला!

News Desk

“हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय,” उद्धव ठाकरेंनी मोदींना टोकलं

News Desk

भाजपने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली त्यामुळे भाजपने तात्काळ माफी मागावी – सचिन सावंत

News Desk