HW News Marathi
महाराष्ट्र

कुर्ला पूर्व द्रुतगती मार्गावर तणाव, नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक

मुंबई | कुर्ल्यातील पूर्व द्रुतगती मार्गावर तणाव पहायला मिळाला आहे. या महामार्गावर नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक केली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर हल्ला देखील करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची १७ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलीचा शोध घेऊनही तिचा काही पत्ता लागत नसल्यामुळे पंचाराम याने नेहरूनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलगी गेल्यामुळे पांचाराम हे दुखी होते. मात्र, पोलिसांना मुलीचा थांगपत्ता लागला नाही.

मुलीचे अपहरण झाल्यानंतर नैराश्येतून कुर्ला परिसरात ४८ वर्षीय पित्याने लोकलखाली जाऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पांचाराम रिठाडिया असे अपहृत मुलीचे वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

अपहरण झालेल्या मुलीचा अद्याप शोध लावलेला नाही म्हणून स्थानिकांनी कुर्ला सिग्नल रोखून धरला. यानंतर नागरिकांनी सायन-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन पुकारले. हे आंदोलन इतके चिघळले चालले असून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आंदोलकांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांना मारहाण केली आहे. तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून वाहनांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगर हत्याकांडाची केस फासट्रॅक कोर्टात चालवा

News Desk

भाजपचे खासदार सायकलवरून संसदेत जायचे, ते तुम्ही विसरालात?, मलिकांनी फडणवीसांना डिवचले

News Desk

अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या परीक्षा रद्द, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्गाची परीक्षा होणार

News Desk