HW News Marathi
महाराष्ट्र

ज्ञानासाठी विद्यार्थ्यांना तुडवावा लागतोय गुडघाभर चिखल, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

उस्मानाबाद | वाशी तालुक्यातील पारगाव येथून जवळ असलेल्या जनकापूर अंतर्गत पवार वस्ती येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पारगाव येथे यावे लागते. पाठीवर असलेलं दप्तराचं ओझं आणि पायाखाली असलेल्या गुडघाभर चिखलातून पायपीट करत पारगाव येथे शाळेत यावे लागते. या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिक आता त्रस्त झाले आहेत.

याविषयीची अधिक माहिती अशी की, पारगाव ग्रामपंचायत अंतर्गत जनकापूर हे गाव आहे. या गावातील बहुतांश लोक वस्तीवर राहतात. या जनकापूर गावाअंतर्गत पवार वस्ती ही 30 घरांची असून या ठिकाणी जवळपास 100 नागरीकांची लोकवस्ती आहे. या ठिकाणी शासनाने वस्ती शाळा मंजूर केलेली असल्याने पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे. जनकापूर ते पवार वस्तीदरम्यान सुमारे  दीड की.मी.चे अंतर असून हा रस्ता शेतरस्ता असल्याने या ठिकाणी चिखलातून ये-जा करावी लागत आहे. पाचवीपासून पुढील शिक्षण घेण्यासाठी विध्यार्थ्यांना पारगावला यावे लागते. यावेळी पाठीवरील दप्तराचं ओझं अन्, पायखालचा गुडघाभर चिखल तुडवत शाळेला यावे लागत आहे.

या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना रस्ता नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोणी आजारी पडले तर बैलगाडीत घालून आणावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणच्या नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. या ठिकाणच्या नागरिकांची आठवण ही राजकीय लोकप्रतिनिधी यांना फक्त मतदानाच्या वेळी येत असल्याचे स्थानिक राहिवाशी सांगत आहेत.

याविषयी स्थानिक रहिवाशी सुनील गायकवाड सांगतात की लोकप्रतिनिधींनीना रस्त्या बाबत विचारले असता राष्ट्रवादीवाले म्हणतात सत्ता आमची नाही सेनेचे आमदार आहेत. तर सेनेच्या नेत्यांना बोललं तर ते म्हणतात पंधरा वर्षे झोपले होते काय? आतापर्यंत का नाही बोलले, या अशा टोलवा-टोलवीच्या उत्तरांनी या ठिकाणची जनता त्रासलेली आहे. मधल्या काळात निवडणुकी दरम्यान हा रस्ता मंजूर झाल्याचे सांगितले होते. दीड की.मी. अंतरापैकी 700 मी. अंतरावर मुरूम टाकला आहे. मात्र त्यापुढे चिखलाचे साम्राज्य असल्याने नागरिकांना चिखल तुडवतच ये-जा करावी लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“….तर त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?” रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

News Desk

अन्यथा आम्ही उग्र स्वरूपाच आंदोलन करू, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

News Desk

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा सत्यजित तांबेनी केला निषेध

News Desk