HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शिवभोजन थाळीचे यशस्वी १७ दिवस

मुंबई | गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी २६ जानेवारी २०२० सुरु झाली. ११ फेब्रुवारी २०२० रोजी योजनेच्या अंमलबजावणीला  १७ दिवस पुर्ण झाले. या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या “शिवभोजन योजने”ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या थाळीची सुरुवात होऊन ८ दिवसातच म्हणजे २ फेब्रुवारी २०२० पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाखांहून अधिक (१ लाख ५ हजार ८८७)  झाली होती. आता ११ फेब्रुवारीपर्यंत या लाभार्थ्यांच्या संख्येत १ लाखांहून अधिकांची वाढ झाली आहे.

गरीब आणि गरजूंना पोटभर जेवन मिळावे असा अट्टहास या योजनेमागे मुख्यमंत्र्यांचा होता आणि त्याच अनुशंगाने त्यांनी स्वत: या योजनेत जातीने लक्ष दिले. शिवभोजनेच्या या योजनेत जेवण देताना स्वच्छता पाळली जाते का, जेवणाचा दर्जा उत्तम आहे का याकडेही त्यांनी कायम लक्ष दिले. काहदिवसांपुर्वी उद्धव ठाकरेंनी ज्या शिवभोजन केंद्रातून या भोजनाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत जेवणाने ते समाधानी आहेत का याचीही विचारपूस केली.

शिवभोजनाच्या या थाळीची किंमत शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. परंतु लाभार्थ्याला फक्त १० रुपये देऊन जेवणाचा आस्वाद घेता येतो. उर्वरित फरकाची रक्कम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण  विभागाकडून अनुदान स्वरूपात संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना आणि मुंबई आणि ठाण्यासाठी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्याची तरतूद योजनेत आहे.

Related posts

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

राफेलबाबत संरक्षणमंत्री एका पाठोपाठ एक खोटे बोलत आहेत !

News Desk

मुख्यमंत्र्याचे शहर आणि राज्याची उपराजधानी असूरक्षित – जयंत पाटील 

Ramdas Pandewad