HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांनी दगड-चप्पल फेक आंदोलन करणे, हे अतिशय दुर्दैव! -धनंजय मुंडे

बीड | एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात न्यायालयाने काल निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आनंद देखील साजरा केला होता. परंतु, आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओके या त्यांच्या निवसस्थांनी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक व चप्पल फेक आंदोलन करणे हे अतिशय दुर्दैव म्हणावे लागेल, अशी खंत सामजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. 

धनंजय मुंडे म्हणाले, “आजपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना जे दिले गेले नाही, तेवढे शरद पवार यांनी दिली. आज जो प्रकार घडला त्या नक्कीच षडयंत्र आहे, हे एकदा तपासून पाहिजे पाहिजे. राज्याची शांतता सतत बिघवडण्याचे काम सुरू आहे. हे सर्व राज्याच्या जनतेने पाहणे गरजेजे आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आंदोलन करणे हे इतिहासात कधीच झाले नाही, हे चुकीचे आहे. तर न्यायालयाने दिलेला निर्णय हा राज्य सरकारला बंधनकारक आहे. न्यायालायने काल निर्णय दिला तेव्हा सर्वांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यानंतर आज अचानक कर्मचाऱ्यांनी विरोधाकांची भूमिका घेणे हे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

माझ्या घरावर मोठा हल्ला, ही दुर्दैवी घटना – सुप्रिया सुळे

माझ्या घरावर हल्ला ही दुर्दैवी घटना असून शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यास तयार आहोत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पोलिसांचे आभार मानले आहे.” मी पोलिसांचे आभार मानते. माझ्या घरावर मोठा हल्ला, ही दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे पहिल्यांदाच घडले. मी हात जोडून विनंती करत आहे. मी तुमच्यासोबत ह्या क्षणी बसून चर्चा करण्यास तयार आहे. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहेत. मला माझ्या कुटुंबीय सुरक्षित मला बघू द्या. मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय की, मी तुमच्यासोबत ह्या क्षणी बसून चर्चा करण्यास तयार आहे. परंतु, या गोंधळाच्या वातावरणात चर्चा होणार नाही. मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करते. मला माझ्या आई-वडील आणि मुलीला भेटून मी दोन मिनिटात तुमच्यासबोत बोलते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३६ जिल्ह्यांना आमदार रोहित पवारांकडून मदतीचा हात

News Desk

वास्तविक हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केलाय – अण्णा हजारे  

News Desk

धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले नवजात बाळाचे पालकत्व

swarit