HW News Marathi
देश / विदेश

उद्या हे लोक ‘परमबीरसिंग यांचा मेंदू भाजपने हॅक केलाय’ असेही म्हणतील !

मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२१ मार्च) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊन गेल्यानंतर परमबीर सिंग यांनी आरोप केल्याचा शरद पवारांनी आरोप केला आहे. दरम्यान, अशा पद्धतीने शरद पवारांनी थेट फडणवीसांकडे रोख ठेवल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यत्तर दिले आहे.

शरद पवारांच्या फडणवीसांवरील आरोपावर प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की “शरद पवार यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही. उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपने हॅक केला, असेही म्हणतील. शरद पवारांनी असले बिनबुडाचे आरोप करू नये. या प्रकरणात आधी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा आणि त्यानंतरच प्रकरणाची चौकशी करावी”, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे. दरम्यान, “फडणवीस दिल्लीहून राज्यात परतल्यानंतरच परमबीर यांनी पत्र लिहिले” असा आरोप पवारांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एस. ए. बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींची मंजुरी

News Desk

तेलंगणामध्ये पार पडला समलैंगिक जोडप्याचा विवाह सोहळा

Aprna

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Aprna