सांगली | “मी आबांच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. मी जनतेसोबत राहणार,” असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या तासगाव कवठेमहांकाळ उमेदवार आणि राज्याचे माजी गृहमंत्री आबा पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी एच. डब्ल्यु. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. सुमन पाटील पुढे म्हणाल्या की, “आबांनी जनतेला भरभरून दिले, जनतेनेही आबांनी उंचीच्या शिखरवर नेहले. त्यामुळे मला विश्वास आहे की, जनता मला भरभरून मतदान करणार,” असे विश्वास त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटल्या आहेत.
सुमन पाटील यांनी एच. डब्ल्यु. मराठीशी बोलताना म्हणाल्या की, आजपर्यंत आबांनी काम केले होते. आबासोबत राहिलेले सहकारी, जनता आणि परिवार यांच्यामुळे मी काम करत आहे. आबांची जनता ही माझा परिवार आहे. या परिवारांची मला सात आहेत. राहुतला युवकांचा ही चांगला प्रतिसादत असून आबांसोबत असलेले सर्वजणांनी सहकार्य केले असून रोहित हा बाबांचा वारसा पुढे चालविणार आहे.
तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे कुटुंबियासारखे आमच्याकडे लक्ष दिले, असे सुमन पाटील यांनी एच. डब्ल्यु. मराठीशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने सुमन पाटील यांना तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सुमन पाटील यांच्या विरोधात भाजपकडून अजितराव घोरपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.