मुंबई | वरळीतील ट्राफीक सिग्नलची दृष्यमानता वाढवण्यासाठी खांबावर केलेल्या विद्युत रोषणाईचा फोटो ट्विट करत आदित्य ठाकरेंनी याची माहिती दिली. मात्र आता प्रसिद्द मराठी अभिनेता सुमीत राघवन यांनी यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ” आदित्य जी, कृपया या गोष्टींवर पैसे वाया घालवू नका. या ‘हाय व्हिजिबिलिटी सिग्नल्स’चा काही उपयोग नाही. उलट या फॅन्सी लाइट्सची देखभाल ही आणखी एक समस्या आहे.” असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. कृपया वाहन चालकांना संवेदनशील करण्यासाठी चांगली योजना आणा असा सल्ला देखील दिला.
टीकेला आदित्य ठाकरे उत्तर देणार का?
यातुनच त्यांनी वरळीतीली काही ट्राफीक सिग्नलवर दृष्यमानता आणि सौंदर्य वाढवण्यासाठी विद्युत रोषणाई केली असून, त्याचे फोटो राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचं हे ट्विट आता एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे. दुसरीकडे दित्य ठाकरे हे सध्या वेगवेळ्या आघाड्यांवर काम करताना दिसत असून, आपल्या मतदार संघाकडे त्यांचं खास लक्ष असल्याचं पाहायाला मिळतंय. सुमीत राघवन यांच्या या ट्विटमुळे या सिग्नलची मात्र चांगलीच चर्चा होत आहे. त्यांच्या या टीकेला आदित्य ठाकरे उत्तर देणार का हे आता पाहावं लागणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.