HW News Marathi
महाराष्ट्र

ED चं समन्स आणि खडसेंची तब्येत खालावली, आजची पत्रकार परिषदही रद्द

पुणे| राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आले आहेत. यासाठी आज (८ जुलै) त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्याआधी खडसे आज पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार होते असं कळतं होतं. परंतू त्यांची तब्येत खालावल्यामुळे आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता खडसे यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं.

काय आहे भोसरी येथील जमिन खरेदीचा घोटाळा?

सन 2016 मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केली होती. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना अकानी नामक व्यक्तीकडून खरेदी केला होता. पुण्याच्या उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात 30 मे 2016 ला तक्रार दाखल केली होती. गावंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी पुढील कारवाई न केल्याने गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने गावंडे यांच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत विभागाला दिले होते. एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत विभागाने खडसे, त्यांची पत्नी, जावई आणि अकानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली.

चौकशीनंतर एप्रिल 2018च्या शेवटच्या आठवड्यात लाचलुचपत विभागाने पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला ज्यात त्यांनी खडसे यांना क्लीनचिट देण्यात आली होती. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचे नुकसानही झाले नाही, असे लाचलुचपत विभागाने त्या अहवालात म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी खडसेंची याच प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजघराणे मराठा समाजासोबत कायमच आहे – शिवेंद्रसिंहराजे भोसले

News Desk

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल! – नाना पटोले

Aprna

कीटकनाशक व्यवस्थापन कायदा -२०१७ तात्काळ अस्तित्वात आणा -महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनची मागणी

News Desk