HW News Marathi
महाराष्ट्र

सुनिल पाटीलला आयुष्यात भेटलो नाही, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाहीच – नवाब मलिक

मुंबई। मोहित भारतीय याने ड्रग्ज क्रूझ प्रकरणाचा खरा मास्टर माइंड सुनिल पाटील ही व्यक्ती असून सुनिल पाटील आणि नवाब मलिक ललित हॉटेलमध्ये भेटले होते, असा आरोप नवाब मलिकांवर केला. त्यावर उत्तर देत नवाब मलिकांनी ‘सुनिल पाटीलला मी आयुष्यात भेटलो नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नसल्याचा’ खुलासा नवाब मलिकांनी केला सुनिल पाटील अमित शहांसोबत व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सुनिल पाटील फ्रॉड व्यक्ती आहे. त्याचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाचे फोटो समोर आले आहेत. अनेक नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. मनिष भानुषालीचे देखील पंतप्रधानांपासून मोठ्या व्यक्तींसोबत फोटो आहेत. फोटोंविषयी मला काहीच म्हणायचे नाही परंतु सुनिल पाटील फ्रॉड व्यक्ती आहे. वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचा तो भाग आहे, असे मलिक म्हणाले.

मलिकांनी एनसीबी आणि एका अधिकाऱ्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले

सुनिल पाटीलकडे क्रूझ प्रकरणाची माहिती होती ही माहिती एनसीबीला देण्यात आली आणि कारवाई करण्यात आली. नवाब मलिकांनी एनसीबी आणि एका अधिकाऱ्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले असा आरोप मोहित भारतीय याने केला होता. यावर उत्तर देत नवाब मलिकांनी म्हटले, विजय पगारे नामक व्यक्ती माझ्याकडे आली. त्यांनी मला ललित हॉटेलमधील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. मनीष भानुशाली,धवल भानुशाली,सॅम डिसूझा यांच्या नावाने ललित हॉटेलमध्ये ७ महिने रुम बुक होती. तिथून प्रायव्हेट आर्मीचे काम सुरू होते. समीर वानखेडेंना ही गोष्ट उद्या बाहेर येणार हे माहिती होते म्हणून मोहित भारतीयच्या माध्यमातून आधीच सांगितली पाहिजे म्हणून काल पत्रकार परिषद घेण्यात आली असे नवाब मलिक म्हणाले.

विजय पगारेंसोबत असलेल्या साथीदाराच्या फोनवरुन सुनिल पाटीलला फोन लावण्यात आला

६ तारखेला मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मला सुनिल पाटीलचा फोन आल्याचे नवाब मलिकांनी सांगितले. मी धुलिया येथून बोलत असून तुम्ही घेतलेल्या पत्रकार परिषदेविषयी मला आणखी माहिती द्यायची आहे. दुसऱ्या पत्रकार परिषदेच्या वेळी देखील त्याचा मला फोन आला. विजय पगारेंसोबत असलेल्या साथीदाराच्या फोनवरुन सुनिल पाटीलाल फोन लावण्यात आला त्याच्याशी बोलणे झाले. मुंबईत ये बोलू. कोणालाही घाबरू नका. नवाब मलिक तुम्हाला पोलिसांच्या पुढ्यात हजर करतील. पोलिसांना सत्य सांगा. त्याने सांगितले मी गुजरातमध्ये असून मला रोखून ठेवण्यात आले आहे. मी त्याला आजही बोलावले होते मात्र तो आजही आलेला नाही, असे मलिक यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या जाचाला कंटाळून अपंग कुटुंबाचं उपोषण

News Desk

नवाब मलिक वैफल्यग्रस्त झालेत प्रविण दरेकरांची टीका!

News Desk

समीर वानखेडे प्रकरणात NIAची एन्ट्री, वानखेडेंच्या चौकशीसाठी NIA टीम NCB कार्यालयात दाखल

News Desk