HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली | राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिफारसीनंतर काल (१२ नोव्हेंबर) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. शिवसेनेने बहुमत सिद्ध करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, राज्यपालांनी मुदत वाढवून देण्यास नकार दिला होता. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालायात याचिका घेतली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आज (१३ नोव्हेंबर) तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस नेते आणि वरिष्ठ कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. परंतु आता न्यायालयाने तातडीने या प्रकरणी सुनावणीस नकार दिला आहे. शिवसेनेने आज याचिका दाखल करावी असे काल सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. यानुसार शिवसेनेने आज सकाळी याचिका दाखल केल्यानंतर यावर सुनावणी कधी होईल हे न्यायालय ठरवेल, असे सर्वोच्च न्यायालय यांनी म्हटले

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदोरीकर महाराजांना पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

News Desk

रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अमृता फडणवीस म्हणतात…

News Desk

राज्यपालांकडे १२ नावांची यादी पोहोचली, प्रतीक्षा निर्णयाची!

News Desk