HW News Marathi
महाराष्ट्र

चर्चा योग्य दिशेने सुरू, निर्णय लवकरच कळेल !

मुंबई | चर्चा योग्य दिशेने सुरू आहे. निर्णय लवकरच कळेल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे यांची आज (१३ नोव्हेंबर) ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. या बैठकीसाठी नुकतेच लिलावतीतून डिस्चार्ज मिळालेले शिवसेनेचे आमदार संजय राऊत हॉटेलमध्ये चर्चा करण्यासाठी गेले होते.

तब्बल ५५ मिनिटे चाललेल्या बैठकीत उद्धव ठाकरे, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचे समान वाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांशी आधी आम्ही चर्चा करु, त्यानंतर शिवसेनेशी चर्चा करु, सर्व मुद्द्यांवर चर्चा करु, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. थोरात पुढे म्हणाले की, आज उद्धव ठाकरेंना आम्ही भेटलो, कालच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट होती. आता आम्ही राष्ट्रवादीसोबत बैठक करु, त्यानंतर पुन्हा सेनेशी चर्चा करु, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

किमान समान कार्यक्रमासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावं, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेची नावं समाविष्ट होतील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे,कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा

swarit

धवलसिंहांनी बिबट्याला टिपलं तसं आता भाजपला टिपणार – धीरज देशमुख

News Desk

कसाबने लपवलेला शस्त्रसाठा शोधून काढणारा ‘कॅनिंग सैनिक’ कालवश

News Desk