नवी दिल्ली | भीमा कोरेगाव हिंसाचार आणि अर्बन नक्सलशी संबंध असल्याच्या आरोपावरून प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच तेलतुंडे यांना अटक न करण्यासाठी आणखी चार आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली. जामिनासाठी अर्ज करता यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Supreme Court refuses to quash FIR against Anand Teltumbde, one of the accused in the Bhima Koregaon case. However, SC grants him four weeks protection to obtain bail. CJI says, "Investigation is getting bigger & bigger. At this stage quashing of the proceedings is uncalled for"
— ANI (@ANI) January 14, 2019
आनंद तेलतुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी(१४ जानेवारी) सुनावणी झाली. यावेळी या प्रकरणाचा तपास मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशा स्थितीत गुन्हा रद्द करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तपास सुरु असल्याने याप्रकरणात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले.
गेल्यावर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार आणि नक्षलवाद प्रकरणात तेलतुंबडे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र ‘मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.