HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील गोमांस बंदीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाने गोहत्यावर बंदी घातली तरीही गोमांस जवळ बाळगणे आणि बाहेरून राज्यात गोमांस आणणे यावर बंदी घातलेली नाही यावर महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घालावी, यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे . यासंदर्भातल्या तीन याचिका न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सोपविण्यात आल्या आहेत.

गोहत्या आणि गोमांस बंदी संदर्भातल्या आतापर्यंत ३० याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत . सामाजिक कार्यकर्ता स्वातिजा परांजपे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात गोमांसवर बंदी हटविण्याची मागणी करणारे याचिकाही न्यायालयात दाखल करण्यात आली आहे .

महाराष्ट्रात गोमांस बंदी प्रकरणाच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे . मात्र या सुनावणीतून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इंदू मल्होत्रा बाहेर पडल्या आहेत . मल्होत्रा अशाच एका प्रकरणात एका पक्षातील वकील असल्याने त्यांनी खंडपीठात राहण्यास नकार दिला आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्यात अपघात – मुख्यमंत्री सुरक्षित

News Desk

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

Manasi Devkar

राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग २ सप्टेंबरपासून सुरु ! 

News Desk