HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

सध्या महाराष्ट्राचे राजकारण तोडपाणीचे !

मुंबई | “राज्यातील सद्यस्थिती पाहता सध्या महाराष्ट्राचे राजकारण तोडपाणीचे झाल्याचे चित्र आहे”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. “कोणाला आपला कारखाना वाचवायचा आहे, कोणाला घोटाळ्यातून बाहेर पडायचे आहे, तर कोणाला ईडी आणि सीबीआयच्या चौकशीपासून वाचायचे आहे. म्हणूनच सध्या अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत”, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केला आहे. त्या परभणीत पत्रकारांशी बोलत होत्या.

“काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते हे ४ ते ५ कारणांमुळेच पक्ष सोडून जात आहेत. ईडी, सीबीआय, कारखान्यांचे कर्ज अशा काही कारणांमुळे सध्या पक्षांतर सुरू आहे. ही दबावनीती आहे”, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी देखील केला होता. अहमदनगरमध्ये संवाद यात्रेत आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे हे म्हणाल्या होत्या. “भाजपकडे कोणती तरी वॉशिंग पावडर आहे की आमच्यात आरोपी असलेले त्यांच्याकडे गेले की तांदळासारखे धुतले जातात”, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.

राज्यातील विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केल्याने एकीकडे भाजप-शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र आता राज्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

Related posts

आजम खान यांनी माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा कट रचला !

News Desk

मतदान केल्यानंतर कुंभमेळ्यात स्नान केल्याचे भाग्य लाभते | पंतप्रधान मोदी

News Desk

मेट्रोमुळे होणारी वृक्षहानी कमी करण्यासाठी गट स्थापन

News Desk