HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या बनावट आवाजाची एक क्लिप व्हायरल

मुंबई | महाविकास आघाडीचे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या बनावट आवाजाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्या ऑडिओ क्लिपमुळे मोठा गदारोळ झाला आहे. त्या ऑडिओ क्लिपमधून सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांविरोधात प्रचार करत असल्याचं समोर आलं आहे. त्यावरच आता फेसबुक लाइव्ह करून सुप्रिया सुळेंनी खुलासा केला आहे.

फेसबुक लाइव्हमध्ये म्हणतात, “मला काही सहकाऱ्यांचा आणि चॅनेलमधून फोन आले. उस्मानाबाद आणि लातूरच्या काही भागामध्ये माझ्या आवाजाचा आणि खोटा मोबाईल नंबर वापरून आणि लिहून काही लोक प्रचार करत आहेत. त्याचा गैरवापर होत आहे. हे खरंच दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी पातळी सोडून आज आमचे विरोधक प्रचार करत आहेत.

मी तातडीनं पोलीस यंत्रणेची मदत घेतलेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाशीही संपर्क साधलेला आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण म्हणून उमेदवार आहेत, यांनाही मी तातडीनं संपर्क साधलेला आहे. विरोधक जो काही रडीचा डाव खेळत आहेत, तो दुर्दैवी आहे. पदवीधरची ही निवडणूक आहे, औरंगाबादचे आमचे उमेदवार आहेत. कुठलाच विषय राहिला नाही म्हणून विरोधक इतकी पातळी सोडून माझ्या नावाचा गैरवापर करून एक फेक अकाऊंट, फेक नंबर वापरून आज ते प्रचार करत आहेत.

यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे. कुठल्याही पक्षाचे लोक असतील, पण मला कोणावरही आरोप करायचा नाही. पण हे दुर्दैवी आहे, तंत्रज्ञानाचा गैरवापर आमचे विरोधक करत आहेत. सतीश चव्हाणांना मी विनंती केली आहे की आपण न्याय मागितला पाहिजे. महाविकास आघाडीची अशी खोटी बदनामी कोणीही करू नये. विषय नसतील तर बोलू नका, पण खोटा प्रचार करण्यासाठी माझा आवाज वापरू नका, असं आवाहनही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन कामकाज सुरु, व्हीसीद्वारे बैठकांना उपलब्ध

News Desk

मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज – प्रकाश आंबेडकर

News Desk

नाशिक शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

Aprna