HW News Marathi
देश / विदेश

सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या ‘अजित पवारांकडून काहीतरी शिका’ 

नवी दिल्ली | १ फेब्रुवारीला केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावरुन भाजपने केंद्राचे कौतुक केले असले तरी महाविकासआघाडी सरकारने मात्र केंद्राला अर्थसंकल्पावरुन चांगलेच सुनावले आहे… केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेला विशेष काही न आल्याने राज्य सारकारने नाराजी व्यक्त केली.याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना टोमणा मारला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचं भरभरून कौतुक केलंय.एवढंच नाही, अजित पवारांची लोकसभेत स्तुती करताना सुप्रिया सुळेंनी अर्थ मंत्रालयाच्या कारभारावरून भाजपला चांगलाच टोला हाणला. “अर्थ मंत्रालय कसं चालवायचं, याचं मार्गदर्शन, तुम्ही अजित पवारांकडून घेतलं पाहिजे,” असं सुप्रिया सुळे भाजप नेत्यांना उद्देशून म्हणाल्या.अर्थसंकल्पावरील भाषणात सुप्रिया सुळे यांनी जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्राकडून राज्याला 26,597 हजार कोटींच जीएसटीचं येणं बाकी असल्याचं त्यांनी लोकसभेत सांगितलं.सुळे यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांची तुलना केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांत फरक आहे तो सांगू इच्छिते. केंद्राच्या अर्थमंत्र्यांनी देशातील प्रत्येक खासदाराचे १२ कोटी रुपये न विचारता काढून घेतले. काही वेळा लोकं विचारतात की MPलॅंड फंड द्या, पण तो तर मोदीजी घेऊन गेले. आता अडीच वर्षासाठी आम्ही काहीच करु शकणार नाही.याऊलट महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी केलं हाच फरक देशाच्या अर्थमंत्र्यांत आणि महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यात आहे. प्रत्येक आमदाराला मग तो विरोधी पक्षातला का असेना, त्यांना ५ कोटी रुपये निधी वर्षाला मिळेल अशी तरतूद केली. यात कोणतीही कपात केली नाही. केंद्राकडून GSTयेत नसतानाही राज्य सरकारकडून योग्य सोय केली गेली त्यामुळे महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून काहीतरी शिका. केंद्राचं अर्थ मंत्रालय चालवण्यासाठी अजित पवारांकडून मार्गदर्शन घेऊ शकता” असा टोमणा सुळेंनी यावेळी केंद्राला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणात मदतकार्यासाठी सैन्यदलांची मदत देण्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन

News Desk

उत्तरप्रदेशच्या “प्लॅस्टिक बेबी”वर अमेरिका करणार उपचार

News Desk

पाकिस्तानातून निघालेली समझौता एक्स्प्रेस आज अटारीत दाखल

News Desk