HW News Marathi
महाराष्ट्र

पवार कुंटुंबियांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन्स होत नाहीत -सुप्रिया सुळे

पुणे | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज (१६ ऑक्टोबर) पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ज्या भागात कृषी विधेयकासाठी रॅली काढली, त्याच भागात साखर कारखाना बंद आहे. पवार कुटुंबियांवर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत, असे उत्तर सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला दिले आहे.

“जो पर्यंत आमच्या कुटुंबावर टीका होत नाही तोपर्यंत हेडलाईन्स होत नाहीत. कोणीही यावं आणि टीका करुन जावं. ज्या भूमीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी ज्या भूमीवर आमच्यावर टीका केली त्याच भूमीवर त्यांच्या विचारांचा कारखाना आहे तो बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे माहीत आहे. मला त्या तु तु मै मै मध्ये पडायचे नाही. आमचे दिलदार सरकार आहे, दडपशाहीचे सरकार नाही. कोणीही विरोधकांनी जरुर यावं आणि त्यांचे मन मोकळं करावं. आणि राज्याच्या हिताची कामे नक्कीच पुर्ण होतील”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेची ‘ती’ भूमिका आम्हाला पटलेली नाही !

News Desk

विद्यार्थ्यांसाठी उद्योगक्षेत्राने कमवा व शिका योजना राबवा

News Desk

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

Aprna