HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार रुग्णालयात पण सुप्रिया सुळेंनी ‘ब्रीच कॅंडी’च्या गेटवरुन पंढरपूरची सभा गाजवली

मुंबई | एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात एडमिट आहेत. २ दिनसांपूर्वी त्यांच्यासह शस्त्रक्रिया झाल्याने सध्या ते रुग्णालयात आहेत. तर दुसरीकडे.पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक तोंडावर आली आहे. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या रिक्त जागी त्यांच्या मुलाला म्हणजे भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

१७ एप्रिलला ही निवडणूक होणार असून भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. दरम्यान, आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नेते सभा घेताना दिसत आहेत. वडिलांची तब्येत ठीक नसल्याने पंढरपूरात थेट न जाताही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपूरची सभा गाजवली आहे. आज (१४ एप्रिल) सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरुनच व्हर्च्युअल सभा घेत पंढरपूरच्या मतदारांशी संवाद साधला.

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरुन सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या व्हर्च्युअल सभेत पंढरपूरात येण्यात इच्छा होती, कार्यक्रमही ठरला होता पण शरद पवाराच्या तब्येतीमुळे प्रत्यक्ष जायला न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही पंढरपूरचा चेहरामोहरा बदलायचे ठरवले होते. त्यामुळे भारत भालके आणि पंढरपूरासोबत आमचं एक वेगळं नातं होतं.

मात्र, नाना अर्ध्या वाटेवर साथ सोडतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे आता विश्वासाच्या नात्याने ही जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर सोपविली आहे. आता आपण नानांची अधुरी स्वप्नं पूर्ण करु. त्यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मुलाला उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पेटून उठले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूरात भर पावसात सभा घेतली आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ ला साताऱ्यात पावसातली गाजवलेली सभा आठवण करुन दिली. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी व्हर्चुअल सभेत भाग घेत आणखीनच वजन वाढवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका – देवेंद्र फडणीस

News Desk

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना; नितीन राऊत यांची घोषणा

Aprna

मराठा आरक्षणाची स्थगिती हटवण्यसाठी राज्य सरकारचा सर्वोर्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल

News Desk