HW News Marathi
महाराष्ट्र

चला पुन्हा एकदा रामराज्य प्रस्थिपात करुयात, सुशांतच्या बहिणीचा सल्ला

मुंबई | मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईच्या कार्यालयावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडले आहे. पालिकेच्या या कारवाईवर अभिनेता सुशांतसिंग राजपूतची बहिण श्वेतासिंग किर्ती हिने संताप व्यक्त केला आहे.

“हे देवा! हे तर एक प्रकारचं गुंडाराज आहे. अशा प्रकारचा अन्याय सहन केला जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातील या अन्यायाला राष्ट्रपती राजवटीनं उत्तर देता येईल का? चला आपण पुन्हा एकदा राम राज्य प्रस्थापित करुया.” अशा आशयाचं ट्विट करुन श्वेता सिंह किर्ती हिने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/shwetasinghkirt/status/1303711039779864576?s=19

 

पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट करण्यात आले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही तिने म्हटलं होते. दरम्यान, कंगनाच्या याचिकेवर २२ सप्टेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमच्याकडे आरोपी पण आमच्याकडे एक तक्रारदारच गायब! परमबीर सिंहांवरून मुख्यमंत्र्यांचा टोला

News Desk

मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी मातोश्री बाहेर पडावं लागेल – चंद्रकांत पाटील

News Desk

सध्या राज्यात सरकार अस्तित्त्वात आहे, असे वाटतच नाही – नारायण राणे

News Desk