HW News Marathi
महाराष्ट्र

“कॉंग्रेसला सद्य स्थितीतील आत्मचिंतनाची गरज”, सुशीलकुमार शिंदेंनी दिला घरचा आहेर!

पुणे | महाराष्ट्रात कॉंग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे. असं असूनही आगामी निवडणूक काळात त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत कुरबुरी वाढत आहेत. अनेक ज्येष्ठ नेते पक्षाची सद्यस्थिती आणि पक्ष नेतृत्वाबाबत उघडपणे आपले मत मांडत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबाबत मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे. काँग्रेसमध्ये आता संवाद आणि चर्चेची परंपरा संपुष्टात आली आहे. पक्ष चुकीच्या धोरणांवरून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पक्षाला योग्य वाटेवर आणण्यासाठी आत्मचिंतनाची गरज असल्याचं म्हटलं आहे.

पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये शिंदे म्हणाले की, काँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहे. मला याचे खूप दु:ख वाटते. पक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमची धोरणे चुकीची असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा सत्रांची गरज आहे. एकवेळ होती जेव्हा पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. मात्र आता माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही हे मला माहिती नाही, अशी खंतही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

गतवर्षी पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षामध्ये मोठे फेरबदल करण्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या गटाला जी-२३ असे नाव देण्यात आले होते. या गटामध्ये कपिल सिब्बल, शशी थरूर, गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या समावेश होता. पक्षाने आतापर्यंत या नेत्यांची नाराजी दूर केलेली नाही.

काय म्हणाले संजय राऊत?

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर सुशील कुमार शिंदे यांनी काही सांगितले असेल तर पक्षाने या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. कारण ते काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिलेले आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे आणि सत्ताधारी आघाडीला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या हालचाली करत असल्याच्या अफवाही राजकीय वर्तुळात पसरल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल,लवकरचं होणार शस्त्रक्रिया

News Desk

वर्षा राऊत यांना ११ जानेवारीला हजर राहण्यासाठी पुन्हा ईडीकडून समन्स

News Desk

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष एक नंबरच पक्ष होण्यास वेळ लागणार नाही, खडसेंचा विश्वास

News Desk