HW News Marathi
महाराष्ट्र

विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन

कराड | वीज पुरवठ्यादरम्यान येणाऱ्या असंख्य समस्यांमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उंब्रज येथ विद्युत वितरण कंपनीविरोधात त्यांच्याच कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. विजेच्या किंमतीत होणारी दरवाढ, वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजपुरवठा, मिटर रिडींग न घेता केली जाणारी आकारणी व वसुली या सर्व समस्यांमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासो यादव, देवानंद पाटील, विक्रमसिंह कदम, संदिप पवार ,प्रमोद जगदाळे, अॅड‌. ‌कॉ. सयाजीराव पाटील, दिपक जाधव, सुरज जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव, वसंतराव पाटील, शरद जाधव, राजेंद्र जाधव ,सुभाष शिलेवंत इत्यादी आंदोलक उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात विद्युत वितरण कंपनी ग्राहकाला कोणतीही कल्पना न देता शेती पंपासाठी व दिवस रात्र असा केव्हाही विद्युत पुरवठयाच्या वेळापत्रकात बदल करीत आहे. त्यामुळे हे आंदलोन करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अशोक चव्हाणांच्या घरापुढे 20 ऑगस्टला मूक मोर्चा”, संभाजी राजेंची राज्यव्यापी बैठकीत घोषणा!

News Desk

“राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा!”, विनायक राऊतांचं मोदींना पत्र

News Desk

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची ठाण्यात अनोख्या गाण्यावर एन्ट्री!

News Desk