HW News Marathi
महाराष्ट्र

भिमाकोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना ताब्यात घ्या – आठवले

मुंबई : कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही त्यामुळे भिमाकोरेगाव प्रकरणी जर संभाजी भिडे जबाबदार असतील तर त्यांना मिलिंद एकबोटे प्रमाणे अटक झाली पाहिजे.त्यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.चौकशीसाठी संभाजी भिडेंना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी केली.बांद्रा येथील उपनगर मुंबई जिल्हा अधिकारी कार्यालयावर रिपाइंच्या वतीने मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा काढण्यात आला .म्हाडा कार्यालय ते जिल्हा अधिकारी कार्यालय असा मोर्चा ना रामदास आठवलेंच्या नेतृत्वात काढल्यानंतर त्यांच्या संविधान बंगल्यासमोर मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले.

राज्यात मंत्री असताना नामांतराच्या प्रश्नावर आपण मोर्चे काढले आहेत.आताही केंद्रात मंत्री असलो तरी मोर्चे काढणार. हा मोर्चा सरकार विरुद्ध नसून सरकारला बळकटी देण्यासाठी आहे.संविधान कोणी बदलू शकत नाही आणि आरक्षण कोणी घालवू शकत नाही जे असे करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही घालवू. देशाचे संविधान अत्यंत उंचीवर आहे त्याला हात लावायला गेलेल्यांचे मुडदे पडलेले आहेत असे सांगत भारतीय संविधान कधीही बदलले जाणार नाही मात्र याबाबत खोटा प्रचार करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांविरुद्ध हा मोर्चा आहे असे रामदास आठवले यावेळी बोलताना म्हणाले.

अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंदविल्यानंतर पीडित दलितांवर कलम 395 खोटे गुन्हे नोंदवू नयेत असा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी. पदोन्नती मध्ये दलित आदिवासींना आरक्षण मिळण्यासाठी संसदेत कायदा करावा. भीमकोरेगाव हल्ल्यातील साक्षीदार पूजा सकट हिची हत्या झाली असून आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा करावी आदी मागण्या यावेळी मोर्चा तर्फे करण्यात आल्या.या मोर्च्यात कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव , डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव आणि महेंद्र गायकवाड या कार्यकर्त्यांसोबत मोर्च्यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीकडून नोटीस येण्याआधी भाजप नेते आधीच नाव घेत होते’- संजय राऊत

News Desk

‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना’, जितेंद्र आव्हाडांनी केले वादग्रस्त विधान

News Desk

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात!

News Desk