HW News Marathi
महाराष्ट्र

देशात बॅलेट पेपरने मतदान घ्या | उद्धव ठाकरे

मुंबई | एकदाच या देशात बॅलेट पेपरने मतदान घ्या एव्हीएम मशीनचा संशय दूर करा असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झालेत यामध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा विजय असो अशी टीका ट्विटरवरून केली तसेच विरोधक देखील ही ईव्हीएम मशीनची किमया आहे अशी टीका करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील एकदाच या देशात बॅलेट पेपरने मतदान घ्या असा सल्ला भाजपाला देत भाजपाला टोला हाणला.

  • काय म्हणालेत नेमकं उद्धव ठाकरे

ज्या राज्यामध्ये भाजपाची राजवट नव्हती तिकडे त्यांना यश मिळाले. मात्र ज्या राज्यातील लोकांना भाजपाच्या राजवटीचा अनुभव आहे त्याचे मत वेगळे असू शकते असा टोला देखील त्यांनी भाजपाला हाणला. तसेच कर्नाटक मधील जनतेला एकदा यांचा अनुभव घ्यावासा वाटला असेल म्हणून भाजपाला जनतेने निवडून दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच निवडणुकीचे अंदाज चुकतात त्यामुळे आता कोणी धाडस करणार नाही अंदाज लावायचे असे देखील ते म्हणालेत. तसेच भाजपाची घोडदौड निवडणूकामध्ये दिसते आणि ते पोटनिवडणुकीत हरत आहेत असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी हाणला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचं सुचक वक्तव्य

News Desk

कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे २ व्हायरस लोकांवर कधीही ग्रासतील –  अमृता फडणवीस

News Desk

चंद्रकांत पाटील को गुस्सा क्यू आता है? हसन मुश्रीफ म्हणतात…

News Desk