HW News Marathi
महाराष्ट्र

देवस्थानची जमीन हडपल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर निशाणा

मुंबई | “देवस्थानची जमीन हडपणाऱ्या सरकारचा निषेध असो, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय”, अशा घोषणा देत गुरुवारी (२७ जून) विरोधीपक्षांच्या नेत्यांनी विधानसभवनाच्या बाहेर सरकारविरुद्ध फलक दाखविले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या जमिनीबाबत नियम तोडून निर्णय घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी (६ जून) सरकार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर, विरोधकांनी सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे.

१८८५ च्या रजिस्टरमध्ये तशी नोंद असल्याने ती जमीन म्हसोबा देवस्थानाची जमीन नाही म्हणजेच ती इनाम ३ ची जमीन होत नाही. त्यामुळे सरकारला त्याचा नजराणा भरण्याची गरज नसल्याचा निर्णय चंद्रकांत पाटील यांनी घेतला. चंद्रकांत पाटील यांच्या या निर्णयावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील यांनी हा आरोप केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यास प्रत्युत्तर देखील दिले. मात्र, तरीही आज सकाळपासून विरोधकांनी यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच!

News Desk

आपल्याला फसवाफसवीची कामं जमत नाही…आम्ही जे बोलतो ते करतो! – जयंत पाटील

Aprna

ठाकरे सरकारच्या खातेवाटपाची अधिकृत यादी जाहीर

News Desk