HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील मंदिरे खुली; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी घेतले परळीत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

परळी। राज्यातील मंदिरे व सर्व प्रार्थनास्थळे आजपासून दर्शनासाठी खुली करण्यात आली असून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पहाटे 5 वाजता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या वेळी उपस्थित राहून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

प्रभू वैद्यनाथाची आज विशेष पूजा करण्यात आली असून ना. धनंजय मुंडे हे या पूजेस उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व सर्वत्र दिवे लावण्यात आले होते. सरकारने योग्य वेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला असून, याबद्दल मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.भाविकांनी सामाजिक अंतर राखत, मास्कचा वापर करावा तसेच कोविड विषयक नियमावलीचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे.

तदनंतर ना. धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील काळरात्री देवी मंदिर व आरोग्य देवी डोंगर तुकाई येथे दर्शन घेऊन नवरात्रोत्सवाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी,दीपक नाना देशमुख, पंचायत समिती सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, सुरेश अण्णा टाक, राजेंद्र सोनी, संजय फड, अनिल अष्टेकर, राजाभाऊ चाचा पौळ, राजा भैया पांडे, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, राजेश विभूते, रमेश चौंडे, नारायण सातपुते, वैजनाथ सोळंके, श्रीकांत फड, शंकर कापसे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांसह आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यविरोधात पोस्ट लिहणाऱ्या महिलेविरुध्द गुन्हा दाखल

News Desk

Palghar Mob Lynching: ‘त्या’ शब्दांचा चुकीचा अर्थ लावून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, राजकारण करण्याची वेळ नाही !

News Desk

जाणून घ्या… कुठे होणार महाराष्ट्रातील ४८ जागांची मतमोजणी

News Desk