HW News Marathi
महाराष्ट्र

सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे गॅरेजमधील १० बस जळून खाक

पुणे | पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (२० मार्च) भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत शिवशाही बससह १० खासगी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दल २ गाड्या आणि २ वॉट ब्रॉऊझर घटनास्थळी दाखल झाले आहे. पुणे-सातारा रोडवर शिंदेवाडी येथे बसचे बॉडी बांधण्याचे काम केले जाते, अशी माहिती मिळाली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांना सव्वा अकरा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत शिवशाहीसह ८ ते १० बस पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. याशिवाय तेथील आणखी काही बसना आगीची झळ पोहचली आहे. आता आग पूर्णपणे विझली असून कुलिंगचे काम सध्या सुरू आहे. आग नेमकी कशी लागली याची अद्याप माहिती समजून शकलेली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामसेवकावर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी

News Desk

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Aprna

मनसेकडून थेट ‘मातोश्री’ समोरच फोडली दहीहंडी!

News Desk