HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाची लक्षणे आढळल्यास स्वत:हून चाचणी करा, पुणे महापौरांचे आवाहन

पुणे | पुण्यात कोरोनाबाधिताची संख्या वाढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवर यांची एकूण कोरोना रुग्णांची संख्या १०३ पार केली आहे. पुण्यात ज्या नागरिकांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे असतील त्यांनी तातडीने महापालिकेच्या नायडू रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याचे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत ५ जमांचा बळी गेला आहे.

ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांना आधाची अनेक व्यधी होत्या. यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील नागरिकांनी सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे आढळून आली तर तात्काळ नायडू रुग्णालयात उपचारासाठी जावे, असे मोहोळ यांनी पुण्यातील जनतेला आवाहन केले आहे. तसेच मोहोळ म्हणाले की, जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे महत्त्वाचे असून ते पाळण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सचिन वाझेसोबत ओबेरॉयमध्ये येणारी ती बाई कोण?”, नारायण राणेंचा गंभीर सवाल

News Desk

मित्रहो आम्ही दिलेला शब्द जपला…’आरे’च्या जागेवरून आव्हाडांचे ट्विट ! 

News Desk

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी ‘जेलभरो’ आंदोलन!

News Desk