HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारकडून ‘दिवाळी’साठीच्या मार्गदर्शक सूचना जारी, कशावर बंदी ? जाणून घ्या

मुंबई | दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या गृह विभागाकडून देखील दिवाळीसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. इतर सणांप्रमाणेच नागरिकांना यंदा दिवाळीचा सणही साध्याच पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारने यंदा यंदा ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांवर बंदी असल्याचे स्पष्ट केले असून हे कार्यक्रम ऑनलाईन करण्याचा पर्याय निवडण्याचे आवाहन देखील सरकारकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, फटाक्यांच्या वापरावरही काही सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

राज्याच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना :

१. राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे यावर्षीचा दिवाळी सण कोरोना काळात साजऱ्या केलेल्या अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.

२. दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी, मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ नये.

३. फटाक्यांची आतषबाजी करु नये. कोरोनामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा.

४. या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम/कार्यक्रम उदा. दिवाळी पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहितीये”, आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहीत पंकजा मुंडेंचा मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

News Desk

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजारांच्या पार

News Desk

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे व निलम गोऱ्हेंची नावे निश्चित

News Desk