HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती; संजय राऊतांनी पुन्हा भाजपला डिवचलं

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज (११ फेब्रुवारी) मुंबईतील विविध भागांतील विकास कामांची एकत्रित पाहणी केली. यावेळी हे दोन्ही नेते एकाच गाडीत बसून दौऱ्यावर गेले होते. तर यावेळी आदित्य ठाकरे स्वतः गाडी चालवत होते. आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, यावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, यावरून राऊतांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या भेटी वाढल्या आहेत. अशात आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक गोव्या दौऱ्यावर जाणार आहे. गोव्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. मात्र, त्याआधी अजित पवार आणि आदित्य ठाकरेंनी एकत्र येऊन विकास कामांचा आढावा घेतला. यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकारचे स्टेअरिंग हे ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहिल, असे विधान यावेळी राऊत यांनी केले आहे.  

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे व अजित पवार यांनी एकत्रित पाहणी केली हे उत्तम आहे. मात्र, ही भाजपची कळ आहे. पोटात कळ येते तीच ही ती कळ आहे, भाजपच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारची कळ याच कारणामुळे येते. महाविकास आघाडीचे नेते एकत्र असल्याने भाजपची पोटदुखी आहे. दाबदबावाचे राजकारण करून आणि धमक्या दहशतीचं राजकारण करून सुद्धा महाविकास आघाडीला तडा जात नाही त्यामुळे ही त्यांची पोटदुखी आहे, असं म्हणत महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती आहे आणि राहिल, असंही यावेळी राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्ट उभारण्यासाठी हालचालींना वेग; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली बैठक

Aprna

देशाचे चौदावे राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान सुरू छगन भुजबळ जेलबाहेर

News Desk

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण, सेन्सेक्स १५२४ अंकांनी कोसळला

swarit