HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! ठाण्यात १२५ पोलीस कोरोनामुक्त झाले

ठाणे | कोरोनाच्या या कठीण काळात आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. आणि आपल्या सुरक्षेसाठी ते घराबाहेर पडून आपली रक्षा करत आहेत. मात्र, या पोलिस बांधवांना देखील कोरोनाची लागण झाली.

मात्र, दिलासादायक बाब अशी की ठाणे पोलीस आयुक्तालयातील १२५ पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. ठाण्यातील १५ पोलीस अधिकारी आणि ११० कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आता ३ पोलीस अधिकारी आणि ६२ कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाला हरवून सुखरुप घरी परतत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत १९२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १८ पोलीस अधिकारी आणि १७४ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील कोरोनासाठीचे निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार, मोदी सरकारचा निर्णय

News Desk

राज्यात ५ टप्प्यांत जिल्हे होणार अनलॉक! विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा

News Desk

मुख्यमंत्र्यांची राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसमवेत बैठक

News Desk