मुंबई | देशातील लॉकडाऊमुळे राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मंजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यास रेल्वेच्या विशेष ट्रेन परवानगी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे ट्वीट करत आभार मानले आहे. शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले, “रेल्वे मंत्री पियुष योगल आणि रेल्वे मंत्रायल यांना केलेल्या विनंतीनंतर त्यांनी स्थलांतरितांना महाराष्ट्रातून त्यांच्या घर सुरक्षितपणे सोडण्यासाठी ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आहे.”
Thank you Union Railway Minister Shri @PiyushGoyal ji and @RailMinIndia for acceding to our requests for providing trains to transport the migrants from different parts of Maharashtra to their home states safely.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 19, 2020
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्यात अडकून पडलेल्या मंजूर आणि कामगार यांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वच्या ज्यादा गाड्या सोडाव्यात, अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. यानंतर रेल्वे मंत्र्यांनी शरद पवार यांची मागणी मान्य केली. यानंतर शरद पवार यांनी आज (१९ मे) ट्वीट करत रेल्वे मंत्र्यांचे आभार मागले आहे.
Had a telephonic conversation with Shri @OfficeofUT – Chief Minister of Maharashtra and Shri @PiyushGoyal – the Union Railway Minister regarding the issue of migrant workers.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 9, 2020
या मंजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याची पवारांनी सांगितले. महाराष्ट्रात अडकेल्या मंजुरांनाच्या मूळगावी नेहण्यासाठी एसटी बस वाहतुकीची व्यवस्था केली आहे. मात्र, महाराष्ट्रातून मूळ गावी केलेल्या मंजुरांना काही राज्यांनी घेन्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहन पवारांनी ट्वीट करत पंतप्रधानांकडे केली आहे.
संबंधित बातम्या
परतलेल्या मंजुरांचा स्वीकारण्यास राज्यांचा नकार, पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावे !
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.