HW News Marathi
Covid-19

बचेंगे तो और भी लढेंगे ! मुंबई महापौरांचा सूचक इशारा

मुंबई । राज्यातील कोरोनस्थिती बिकट होत चालली आहे. विशेषतः मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (२ एप्रिल) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महापौर पेडणेकर म्हणाल्या की, “मुंबईत आता कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयातील खाटा भरून जात आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे. टाळेबंदी कोणालाच नकोय. पण काही कठोर नियम करावेच लागणार आहे. शेवटी बचेंगे तो और भी लढेंगे. जिवंत राहिलो तर या पृथ्वीतलावर आपण काही तरी करू शकतो”, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. लॉकडाऊन की कठोर निर्बंध याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घोषणा करणार असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. “मुंबईतील कोरोनाची परिस्थिती वाढत चालली आहे. रुग्णसंख्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर बोजा येत आहे. आरोग्य यंत्रणेवरील बोझा कमी करायचा असेल तर आपल्याला अधिक काळजी घ्यायला हवी,” असे यावेळी महापौर म्हणाल्या.

केंद्रातून फार मोठी मदत मिळत नाही !

किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीका केली. “केंद्रातून फार मोठी मदत मिळत नाही. त्यामुळे आम्ही आमच्यापरीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा आणि कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. कोरोना रोखण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या आपण शून्यावर आणली होती. त्यामुळे आताही आपण त्याच दिशेने काम करत आहोत, त्यासाठी सर्वांनी त्रिसूत्रीचे पालन करावे”, असेही आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.

राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार हाच खरा यक्ष प्रश्न !

“नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा”, असे आवाहन करतानाच कोरोनाच्या संकटात राजकारण करणं योग्य नाही. कोरोनामुळे लोक मरत आहेत. त्यामुळे ज्यांच्या जीवावर निवडून येतो, त्यांना चेतवणे योग्य नाही. राजकारण्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये”, असे सांगत नागरिकांचं प्रबोधन करता येईल. पण राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार हाच खरा यक्ष प्रश्न आहे, असा टोला महापौरांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

भाजपने बेजबाबदारपणे वागू नये !

“राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना वाढेल, असे कोणतंही कृत्य करू नये. कोरोना वाढत असताना भाजपने बेजबाबदारपणे वागू नये. हे करणार नाही ते करणार नाही असे बोलून चालणार नाही. आम्ही हे सहन करणार नाही. लोकांच्या जीवाशी खेळू नका. तुम्ही जमिनीवर उतरून काम करणार आहात का?”, असा सवाल देखील महापौर पेडणेकर यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चे १५००च्या आसपास रुग्ण, राजेश टोपेंच्या केंद्राकडे ३ महत्वाच्या मागण्या

News Desk

ICMRच्या सर्वेक्षणानुसार कंटन्मेंट झोनमधील १५ ते ३० टक्के लोकं असू शकतात कोरोना बाधित

News Desk

हिंमत असेल तर इतर वृत्तवाहिन्यांनाही मुलाखत देऊन दाखवा !

News Desk