HW News Marathi
Covid-19

ठरलं ! मराठा क्रांती मोर्चा येत्या ८ डिसेंबरला विधान भवनावर धडकणार

मुंबई । मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय निर्णायक बैठक आज (२९ नोव्हेंबर) पुणे येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थी व नोकरी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना डावलून प्रवेश प्रक्रिया सुरु केल्या प्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे.

महावितरणमध्ये उमेदवारांना डावलून उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय महावितरण ने घेतल्याने मराठा समाज येत्या १ व २ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्या नुसार अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात करणार आहे. त्याच प्रमाणे येत्या ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्रभरातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयकांनी बैठक संपल्यानंतर दिली.

२०१४ ते २०२० प्रलंबित शासकीय नियुक्ती उमेदवार प्रश्र्न , शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुपर न्युमररी , अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यान्वित करणे , असे अनेक प्रश्न शासनाने सोडविले नसल्याने मराठा तरुण आक्रमक आहेत. या बैठकीत दिल्ली येथून छत्रपती संभाजीराजे, ॲड दिलीप तौर, औरंगाबाद एम एम तांबे , अहमदनगर बाळासाहेब सराटे यांनी संवाद साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाप्रमाणे ‘हे’ देखील संकट थोपवून मागे परतवू !

News Desk

देशातील ‘या’ राज्यात पुन्हा ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

News Desk

पुण्यात १२ तासांत ३५ नवे रुग्ण, एकूण कोरोनाबधितांचा संख्या ३ हजार १६९ वर

News Desk