HW News Marathi
महाराष्ट्र

शासकीय कर्मचऱ्यांचे निवृतीचे वय ६० होणार

मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येणार असून शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत पुढील महिन्यात निर्णय घेणार आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत हा निर्णय लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काल (१५ जुलै) राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज मंत्रालयात महासंघाच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्राप्रमाणे राज्यातही पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, वेतन त्रुटींबाबत बक्षी समितीचा दुसरा अहवाल तत्काळ सादर करणे, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वाहतूक भत्त्यासह इतर भत्ते मिळणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिला कर्मचार्‍यांसाठी दोन वर्षांची बालसंगोपन रजा देणे, प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देणे, अधिकार्‍यांच्या पाल्यांनाही अनुकंपा भरती सुविधा लागू करणे अशा विविध १८ मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची निवासस्थानी घेतली भेट…!

News Desk

मुंबई मनपा निवडणूकीत सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही लक्ष घालणार

News Desk

उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, सेनेचा योगींना सल्ला

News Desk