मुंबई | कोरोनाचं संकट सुरु असूनही राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तोफ डागत आहेत. पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आमने-सामने आल्या आहेत. यावेळी कारण आहे ते म्हणजे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनाचा तुटवडा पार्ले पोलीस स्टेशनला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी करत फडणवीसांना अटक करा अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. यावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांची खिल्ली उडवली आहे.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत असं म्हटलंय की, उठले की निघाले आरोप करायला, आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? रेमडेसिवीर राज्य सरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CS साहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची. आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे अशा कठोर शब्दांत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे
तसेच एकाबाजूला राजकारण करू नका हे विरोधी पक्षाला सांगायचं व दुसरीकडे आपलं अपयश लपवण्यासाठी कांगावा करायचा. रोज माणसं तडफडून मरत आहेत. रेमडेसिवीर अभावी देवेंद्र फडणवीस यांनी ब्रूक फार्मा कंपनीला विनंती करत नियमाने FDA ची परवानगी घेत आणण्याचा प्रयत्न केला तर कंपनीच्या माणसांनाच पोलीस उचलतात.
उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे @Dev_Fadnavis ना अटक करा अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय?#Remdesivir राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची आधी
सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 19, 2021
ब्रूक फार्मा रेमडेसिवीरची मदत महाराष्ट्राला करणार होते. त्या कंपनीच्या लोकांना मंत्र्याचा OSD फोनकरून दम देतो? मंत्र्याच्या OSD ची काय एवढी हिंमत की तो कंपनीच्या लोकांना फोनवरून धमकी देईल की सरकारला यातूनही आधी वसूली करायची होती याबाबत चकार शब्द ही सत्ताधाऱ्यांकडून आला नाही असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या होत्या?
रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनवर जाऊन सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते.
या आधीही रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विट वॉर रंगलेले पाहायला मिळाले होते. अनिल देशमुखांचा मुद्दा असो किंवा चित्रा वाघ यांनी नवे गृहमंत्र दिलीप वळसे-पाटील यांना दिलेल्या शुभेच्छा असो. रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना डिवचले होते आणि चित्रा वाघ यांनीही त्यांचा खरपूस समाचार घेतला होता. आता पुन्हा एकदा या जुन्या मैत्रिणींचा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. आता रुपाली चाकणकर काही पलटवार करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.