HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेतृत्व तुमच्या कामावर खुश,चंद्रकांत पाटलांचं चित्रा वाघांना खुलं पत्र !

मुंबई।भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर आता जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवी मोठी जबाबदारी आता सोपवली आहे. महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची धुरा चित्रा वाघ यांच्याकडे देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पत्र लिहून चित्रा वाघ यांना सांगितलं आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चित्रा वाघ यांनी जवळपास 20 वर्षे काम केलं. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली. परंतु 2019 च्या विधानसभेच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही चित्रा वाघ यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तिथेही चित्रा वाघ यांनी आपल्या नेतृत्वगुणाची चमक दाखवली. तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचं नाव एका युवतीच्या मृत्य प्रकरणात आल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात चित्रा वाघ यांचा मोठा वाटा राहिला. भाजप नेतृत्व चित्रा वाघ यांच्या कामावर खूश आहे. त्याचमुळे त्यांच्या हाती आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटलांचं वाघांना पत्र…!

सस्नेह नमस्कार… भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण ही जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात… गेली अनेक वर्ष आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात.. युवती व महिला यांच्या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे ‘भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी’ म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे… आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित फायदा होईल असा मला विश्वास आहे… आपल्या आगामी वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा… आपला चंद्रकांत पाटील

https://www.instagram.com/p/CQvCEuwLdck/?utm_medium=copy_link

राष्ट्रवादित चित्रा वाघ यांनी २० वर्षे काम करून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. मात्र विधानसभेच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यात भाजपने देखील चित्रा वाघ यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा दिली. तिथेही चित्रा वाघ यांनी आपल्या कामाची पावती दिली, आणि तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचं नाव एका मृत्यूच्या प्रकरणात आल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात चित्रा वाघ यांची मोठी भूमिका राहिल्याने भाजप नेतृत्व चित्रा वाघ यांच्या कामावर खूश आहे. त्याचमुळे त्यांच्या कडे आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांचं ट्विटद्वारे शरद पवारांवर टीकास्त्र

Aprna

मविआचे नेते यंत्रणांच्या दबावाला घाबरणार नाहीत; नवाब मलिकांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

News Desk

पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत – निलेश राणे

News Desk