HW News Marathi
Covid-19

राज्यपालांनी ‘या’ सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी !

मुंबई | राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी जी मुख्यमंत्री आणि भजाप नेते नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. राज्यपाल यांची सध्याची कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरली. यापार्श्वभूमीवर राणे यांनी आज (२५ मे) राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात केले होते. राज्यपालांच्या भेटीनंतर राणेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही आणि क्षमता नाही, हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरले आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधक करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र बचाओ आंदोलन देखील केले होते. यानंतर आज (२५ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. पवारांच्या भेटीनंतर आता माजी मुख्यमंत्री आणि भजाप नेते नारायण राणे हे राज्यपालांच्या भेटीसाठी गेले आहे.

राज्यपाल यांनी पवार यांना भेटींचे निमंत्रण दिले होते. आणि पवारांनी राज्यपालांच्या भेटीला मान देत राजभवनावर भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, राज्यपाल आणि पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीदरम्यान कोणत्या विषयावर चर्चा या संदर्भात अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र, पवार आणि राज्यपाल यांच्या भेटीचे अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. तसेच गेल्या दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपालांची भेट घेतील होती. मात्र आज सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी राज्यपालांवर टीका केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परप्रतियांना फुकट सोडणाऱ्या सरकारकडून दलालांमार्फत जनतेची लूट !

News Desk

पुण्यात तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारावीत : अजित पवारांचे निर्देश

Arati More

गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नाजयेरियाचे, कंगना राणावतचा नवा शोध

News Desk