HW News Marathi
Covid-19

गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नाजयेरियाचे, कंगना राणावतचा नवा शोध

मुंबई | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा एकदा एक धक्कादायक विधान केले आहे. गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे असल्याचा शोध कंगनाने लावला आहे. कंगनाच्या या अजब वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कंगना राणावत हीचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात आल्याने ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. नुकतीच तिने चाहत्यांना ईद आणि अक्षय तृतियाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच सर्वांनी एकत्र राहून कोरोनाविरुद्धची लढाई लढण्याचं आवाहनही केलं आहे. तिने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यातून तिने हे आवाहन केलं आहे.

काय म्हणाली कंगना राणावत?

जग अनेक गोष्टींशी सामना करताना दिसत आहे. कोरोना असो की अन्य काही देशांचा संघर्ष सुरू आहे. चांगल्या काळात संयम घालवता कामा नये आणि वाईट काळात हिंमत गमावता कामा नये. आपल्याला यातून काय शिकायला मिळतंय? आता इस्रायलचंच पाहा. काही लाख लोक या देशात आहेत. पण सहा सात देश त्यांच्यावर हल्ला करत आहेत. तरीही हा एकटा देश त्यांच्याविरोधात लढत आहे, असं कंगनाने म्हटलं आहे. त्या देशात असं काय आहे?

तुम्ही स्ट्राईक केली आम्ही त्याला जुमानत नाही, असं युद्धात उभं राहून कोणी बोलत नाही. अशा प्रकारची घाणेरडी वृत्ती तिथे नाहीये. काही लोक नुसती गंमत बघतात. आनंद लुटतात. आता कोरोना काळात एखादी महिला रस्त्यावर बसून ऑक्सिजन घेत आहे आणि ही बातमी इंटरनॅशनल लेव्हलला व्हायरल होते. आणि मग नंतर माहीत पडतं की हे चित्रं कोरोना काळातील नाही, असं कंगनाने म्हटलं आहे.

आता काल जे फोटो व्हायरल झाले, ते गंगा नदीचे असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ते फोटो गंगेचे नसून नायजेरियाचे आहेत. अशा फोटोंचा आपण विरोध करायचा नाही का?, असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.

इस्रायलप्रमाणे प्रत्येक विद्यार्थाला आर्मीत सेवा देणं बंधनकारक करावं. आम्हीही करू. तसेच आपल्याच धर्माचे लोक आपले आहेत, असं ज्याही धर्मात म्हटलं आहे. त्यांची पुस्तके हटवण्यात यावीत, अशी मागणीही तिने केली आहे. तुम्ही हिंदू असो की मुसलमान. शीख असो की ख्रिश्चन असो. आपल्या सर्वांचा एकच धर्म असावा. तो म्हणजे भारतीयता. तुमच्याकडे माणुसकी असायला हवी. आपण एकमेकांची कदर केली तर सर्व मिळून पुढे जाऊ, असंही तिने सांगितलं आहे.

दरम्यान, कंगनाचे ट्विटर अकाउंट काही दिवसांपूर्वी कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. याला कारण आहेत कंगनाची प्रक्षोभक ट्विट. कंगनाने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल आक्षेपार्ह ट्विट केली होती. कंगनाचे वर्तन द्वेष पररवणारे आणि इतरांना दूषणे देणारे आहे, असे ट्विटरने म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाचा आकडा २१५, तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याचं सरकारसमोर संकट !

Arati More

एकट्या धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ४९६ वर

News Desk

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही – मुख्यमंत्री

News Desk