HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, पडळकरांची टिका!

सांगली। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंढरपूरला स्वतः ड्रायव्हिंग करत गेल्याने या चर्चेने अधिकच जोर धरला होता आता याच पंढरपूर दौऱ्यावर टिका व्हायला सुरुवात झाली आहे.“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टिका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावरुन भाजप नेते दररोज टीका करत आहेत. आता गोपीचंद पडळकर यांनीही हा निशाणा साधला आहे.

खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय”,

 

प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच आहे. मात्र तरीही सरकारनं याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

पाच वेळा मा. उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करतंय. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय, अशी टीका पडळकरांनी केली.

संदीप देशपांडेंचीही टिका

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री जसे स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या भेटीला आले, तसेच ते स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत असा टोमणा संदीप देशपांडे यांनी लगावला. देशपांडे यांनी ट्विट करुन हल्लाबोल केला.संदीप देशपांडे म्हणतात, ” हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजगृहावर झालेल्या तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी केले शांततेचे आवाहन

News Desk

BMC च्या रुग्णालयातील मलीन कपडे धुण्याबाबत भ्रष्टचार, भाजप आमदार अमित साटमांचा आरोप

Aprna

अमेझॉन आणि फ्लिपकार्टने मराठी भाषेचा पर्याय आणा अन्यथा मनसे स्टाईलने सण साजरा होईल!

News Desk