मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाल्यामुळे आषाढी एकादशी निमित्त होणा-या पंढरपुर येथील विठ्ठलाच्या शासकीय महापुजेला जाणे टाळले. परंतु रविवारी जाहीर केल्याप्रमाणे सोमवारी सकाळी आपल्या निवासस्थानी फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1021169705397125121
यावेळी बळीराजाला सुखी ठेव, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, असे साखडे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला घातले. यंदा प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची प्रतिमूर्ती ठेवून महापूजा करण्यात आली. मराठा क्रांती कोर्चाच्या आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यासाठी बंदी घातली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत मी पंढरपुरात जाणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली होती. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी पंढरपूरात जाणार नाही असेही ते म्हणाले होते.
पंढरपूर,
अवघ्या महाराष्ट्राचं माहेर…
हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावातील (तालुका-शेणगाव) सौ. वर्षाताई आणि श्री अनिल गंगाधर जाधव या शेतकरी दाम्पत्याने आज माऊलीची शासकीय महापूजा केली, याचा मला विशेष आनंद आहे.
या दाम्पत्याचे मन:पूर्वक अभिनंदन ! pic.twitter.com/KWxdgAx265— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.