HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री संपूर्ण ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढणार

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. ही यात्रा १ ते ३१ ऑगस्टपर्यंत राज्यभर मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढणार आहे. ही यात्रा संपूर्ण ऑगस्ट महिन्याभर चालणार आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने गेलेल्या विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ही यात्र काढण्यात येणार आहेत. या निर्णयासोबत फिर एक बार, शिवशाही सरकार आणि अब की बार, २२० के पार अशी घोषवाक्य देखील या रशयात्रेसाठी देण्यात आली आहेत.

ही रथयात्रा ऑगस्ट महिन्यात काढण्यात येणार आहे. तसेच राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही रथयात्रा जाणार असल्याची माहिती मिळाली नमूद केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवशाही सरकार आणायची आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणूक होणार आहे.

आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युती होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. विधानसभेच्या तयारीसाठी शिवसेनेकडून शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. यानंतर आता भाजप देखील विधानसभेच्या तयारीसाठी जोमाने मैदानात उरतण्याच्या तयारीत असेल.

असा आहे भाजपचा विधानसभा निवडणुकीसाठीचा रणनिती

  • १ जुलै ते १५ ऑगस्ट – नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा)
  • १५ जुलै ते १५ ऑगस्ट – विस्तारक योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत)
  • २१ जुलै २०१९ – प्रदेश विस्तारित कार्यसमिती
  • २५ जुलै ते १० ऑगस्ट – जिल्हासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक
  • १ ते १२ ऑगस्ट – शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन)
  • ९ ऑगस्ट – सदस्यता अभियान ड्राइव्ह
  • १० ते २५ ऑगस्ट – विधानसभाश: बूथ कार्यकर्ता संमेलन
  • १६ ऑगस्ट – रक्षाबंधन कार्यक्रम
  • १ ते ३१ ऑगस्ट – महाजनादेश यात्रा
  • १५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर – विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम निर्वाचित सदस्य संमेलन
  • १६ ऑगस्ट – अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण) तसंच गणेशोत्सवात सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर आधारित सजावट तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा – गणेशोत्सव मंडळ तसंच घरगुती गणपतींसाठी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

News Desk

WWE मधील ‘द ग्रेट खली’ यांचा भाजपमध्ये प्रवेश

Aprna

कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा !

swarit