पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे असे या व्यक्तीचे नाव आहे. तो वडगाव शिंदे, हवेली येथील असून एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करून, त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे याने गेल्या ७ मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. घटनात्मक पदावर असलेल्या आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशी कृती केल्या मुळे त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शरद पवार यांच्याबद्दलही आक्षेपार्ह लिखान याधी करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात, सोशल मीडियावरील बनावट अकाउंटवरून शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणे तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल २६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २७ मार्च ते ७ एप्रिल २०२१ दरम्यान हा प्रकार घडला होता. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे यांनी फिर्याद दिल्यानुसार याप्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह, हिणकस, विकृत, बदनामीकारक लिखाण केले. तसेच सोशल मीडियावरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.