HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही !

मुंबई | देशात महाराष्ट्रमध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी आज (२६ मे) व्हिडिओ कोन्फरेंसिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली आहे.  राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रामधील सरकारला काँग्रेसने समर्थन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णय घेण्याइतके अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असून राज्यात तुमचे सरकार, यावर राहुल गांधी म्हणले “दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील कोरोना रुग्ण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सरकारला आम्ही समर्थन दिले आहे. पण महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हे उद्योगांचे केंद्र बिंदू आहे. आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी,” अशी भूमिक त्यांनी मांडली.

लॉकडाउन पूर्णपणे अपयशी 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटले होते की, २१ दिवसात आपण करोना व्हायरसचा पराभव करू. मात्र, आता ६० दिवस झाले आहेत. आणि देशात सध्या लॉकडाऊनचे चार टप्पे पूर्ण होत आले आहे. तरही कोरोना रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. या परिस्थिती आता लॉकडाउन हटवण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधानांना जे अपेक्षित होते, ते परिणाम मिळालेले नाहीत. त्यामुळे आता पुढे सरकार काय करणार आहे. कारण लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरला आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला

 

 

Related posts

मराठा आरक्षणासाठी ठाकरे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेणार ?

News Desk

‘कोविड’साठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे १२३ कोटी खर्च

News Desk

माऊलींच्या पादुका ३० जूनला एसटीने पंढरपूरला जाणार !

Arati More